“मीेग्ज” क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुयश! मीेग्ज कोचिंग क्लासेस ही संस्था गेली पंचवीस वर्षे अकोल्यातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करीत आहे. वर्ष २०१९ मध्ये पालकांच्या खास आग्रहास्तव “मीेग्ज” जुनियर फाउंडेशनच्या वर्ग ६ व ७ च्या बॅचेस सुरू करण्यात आल्या. या बॅचेस च्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त “मीेग्ज” चेच नव्हे तर आपल्या “अकोल्याचे” ही नाव राज्यभर केले आहे. कोरोना महामारी च्या संकटामुळे सगळीकडे निराशाजनक वातावरण असताना या विद्यार्थ्यांच्या यशाने नक्कीच नवीन उत्साह प्रदान केला आहे! अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विविध शैक्षणिक पद्धतींचा वापर करून “मीेग्ज” च्या शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन व पालकांच्या सहकार्याने हे यश संपादन केले आहे. ज्या विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे त्या खालीलप्रमाणे आहेत

(A) महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम २०२०- याची जिल्हास्तरीय मेरिट लिस्ट खालील प्रमाणे… १) गार्गी भावसार- प्रथम क्रमांक. २) संस्कृती पाठक जिल्ह्यातून दुसरी ३)युवराज गोडे जिल्ह्यातून तिसरा ४) मृदुला देशमुख जिल्ह्यातून चौथी

(B) सायन्स विस्डम स्कॉलरशिप एक्झाम २०१९-२० :- (१) संस्कृती पाठक अकोला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सहावा. २) हंसिका मोटवानी ७२/१०० गुण (३) गार्गी भावसार ७०/१००.

(C) Maths विस्डम स्कॉलरशिप एक्झाम २०१९-२०:-(१) संस्कृती पाठक अकोला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्रातून सहावा! मिळवलेले गुण ९०/१००

(D) सर सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षा २०२०– संस्कृती पाठक संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक गुण ९४/१००. संपूर्ण महाराष्ट्रातून पहिली आल्यामुळे संस्कृती पाठक ला या परीक्षेचे बक्षीस म्हणून रुपये पाच हजार किमतीचा टेलिस्कोप बक्षीस म्हणून मिळाला आहे. हंसिका मोटवानी ८२/१०० अकोला जिल्ह्यातून दुसरी आणि इतर सर्व जिल्ह्यातून चौथी हिला 900 रुपये किंमतीची एक सायन्स किट बक्षीस म्हणून मिळाली आहे. मृदुला देशमुख ७८/१०० गुण, अकोला तालुक्यातून पहिली आणि ऋजुता घोगरे व सार्थक देशमुख आणि प्रसन्न सोनी हे सर्व तालुका पातळीवर दुसरा क्रमांक मिळवून बक्षीसास पात्र ठरले आहेत.

(E) भास्कराचार्य Maths ऑलिम्पियाड एक्झाम २०१९-२०:- (१) संस्कृती पाठक “ए” ग्रेड (२) मृदुला देशमुख “ए” ग्रेड . (F) ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झाम २०१९-२०:- (१) संस्कृती पाठक:- सिल्वर मेडल आणि संपूर्ण भारतातून क्रमांक ९५ (२) युवराज गोडे:- ब्राँझ मेडल. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे “मीेग्ज” चे संचालक श्री राजेश जोध सर व श्री अजय देशपांडे सर व “मीेग्ज” फाउंडेशनच्या अर्चना पंडित मॅडम व सर्व “मीेग्ज” टीमने अभिनंदन केले आहे.

Write your comment here...